
स्थैर्य, औंध, दि.०१: औंध येथील प्रमोद बाबूराव हजारे वय 40 वर्षे याने दारुच्या नशेत राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मयत प्रमोद हजारे याने आपले राहते घरी आज गुरुवारी दुपारी 2:30 च्या दरम्यान घरातील अँगलला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. वरील घटनेची औंध पोलीस स्टेशनला नोंद झाली आहे. म्रुत्युचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

