दिशा समितीच्या सदस्य पदी दत्ता अनपट


दैनिक स्थैर्य । दि. 12 मे 2025 । फलटण | सातारा जिल्हा समन्वय व सनियंत्रण समितीच्या सदस्य पदी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य धैर्यशील उर्फ दत्ता अनपट यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सातारा लोकसभेचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे या समितीचे अध्यक्ष आहेत तर सहअध्यक्ष म्हणून माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते – पाटील आहेत. समितीचे सचिव हे जिल्हाधिकारी आहेत तर सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह जिल्हास्तरीय सर्व विभागाचे प्रमुख पदसिद्ध सदस्य असतात.

आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दिपक चव्हाण, बाजार समतीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शिफारसीनुसार खासदार धैर्यशील मोहिते – पाटील यांनी सदरील नियुक्ती केली आहे.


Back to top button
Don`t copy text!