पोलीस स्मृती दिनानिमित्त माजी सैनिक कल्याण व कृषि मंत्री दादाजी भुसे यांचे शहिद पोलिसांना अभिवादन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २१ ऑक्टोबर २०२१ | नाशिक | देशासाठी आपले कर्तव्य बजावताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूर पोलिसांचे स्मरण ठेवण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 21 ऑक्टोबर रोजी पोलिस स्मृतिदिन साजरा केला जातो. त्या अनुषंगाने माजी सैनिक कल्याण व कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी पोलीस स्मृती दिनानिमित्त नाशिक आयुक्तालय येथील शहिद पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर, पोलीस आयुक्त दिपक पांडे, जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील, उपवनसंरक्षक वन विभाग पंकज गर्ग, अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, पोलीस उपायुक्त अमोल तांबे, विजय खरात, पौर्णिमा चौगुले, अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे यांच्यासह पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.

पोलीस दलातील हुतात्म्यांच्या स्मृतीला अभिवादन करतांना कृषीमंत्री दादाजी भुसे म्हणाले, देशासाठी आपले कर्तव्य बजावताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूर पोलिसांचे स्मरण ठेवण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 21 ऑक्टोबर रोजी पोलिस स्मृतिदिन साजरा केला जातो. 21 ऑक्टोबर 1959 रोजी लडाख येथे चीनच्या सैनिकासोबत लढतांना केंद्रीय राखीव दलाच्या दहा जवानांनी प्राणाची आहुती दिली होती. या जवानांच्या स्मरणार्थ हा दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो.

यावेळी देशात 1 सप्टेंबर 2020 ते 31 ऑगस्ट 2021 या कालावधीत विविध पोलीस दलामधील वीरगती प्राप्त झालेल्या 377 पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार व कर्मचारी याबरोबरच कोरोना काळात जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण पोलीस दलातील शहिद झालेल्या

23 अंमलदारांची यावेळी नावे वाचून दाखविण्यात आली. याप्रसंगी जिल्ह्यातील देवळाली कॅम्प येथील शहिद पोलीस हवलदार निवृत्ती बांगारे यांच्या कुटुंबियांना माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले. त्यानंतर मंत्री श्री. भुसे यांनी उपस्थित असणाऱ्या शहिदांच्या कुटुंबियांची भेट घेतली.


Back to top button
Don`t copy text!