
दैनिक स्थैर्य । 21 मे 2025। फलटण । कोळकी तालुका फलटण येथील ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सौ रेश्मा संजय देशमुख यांना भारताच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या भाची दुमुनी मुर्मू यांच्या हस्ते नुकतेच राज्यस्तरीय महाराष्ट्ररत्न गौरव पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले आहे.
कोल्हापूर येथे महाराष्ट्रदिनी झालेल्या कार्यक्रमात सौ. रेश्मा देशमुख यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्काराने विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.
पैलवान संजय देशमुख गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, राजकीय, व्यावसायिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्याबरोबरच त्यांच्या पत्नीही सौ. रेश्मा देशमुख या कार्यरत असतात. सध्या त्या कोळकी ग्रामपंचायतच्या सदस्य म्हणूनही कार्यरत आहेत. मागील पंचवार्षिक निवडणुकीत त्यांनी सरपंच म्हणूनही यशस्वीरित्या कामकाज पाहिले होतेे. कोळकीचे नावलौकिक मोठे करण्यात त्यांचे योगदान आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.