
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. ३१ जानेवारी २०२४ | फलटण |
पुणे येथील जगन्नाथ रामचंद्र घळसासी सर (वय ९१) यांचे नुकतेच पुण्यात निधन झाले. फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजीराजे हायस्कूलचे १२ वर्ष व मालोजीराजे शेती शाळेचे १३ वर्ष प्राचार्य म्हणून त्यांनी काम केले आहे. मालोजीराजे शेती शाळेचे पहिले प्राचार्य म्हणून काम केले होते.
पुणे येथील घळसासी उद्योग समूहाचे प्रमुख अनंत घळसासी यांचे ते वडील होत. त्यांच्या पाठीमागे भाऊ, सुना, नातू, पुतणे असा मोठा परिवार आहे.
फलटण व परिसरातील त्यांचें अनेक विद्यार्थी कृषी अधिकारी, इंजिनिअर, डॉक्टर, सायंटिस्ट म्हणून काम करत आहेत. पुणे येथे अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
