पालखी सोहळ्यात आरोग्य शिबीर हा स्त्युत्य उपक्रम : माजी खासदार रणजितसिंह


दैनिक स्थैर्य | दि. 30 जून 2025 | फलटण | भारतीय जनता पार्टी फलटण तालुका व पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी गणेश उत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदरील कार्यक्रमास उस्फुर्त असा प्रतिसाद मिळाला असून दरवर्षी वारीच्या काळामध्ये सदरील उपक्रम राबविण्यात येईल असा विश्वास माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

फलटण येथील गजानन चौक येथे भारतीय जनता पार्टी फलटण तालुका व पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी गणेशोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदरील कार्यक्रमाचे उद्घाटन फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य ॲड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर, माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला तालुकाध्यक्ष सौ. प्रतिभा चेतन शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाले.

यावेळी बोलताना युवा नेते संदीप चोरमले म्हणाले की, राज्याचे उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील व समर्थ युवा फाउंडेशनचे अध्यक्ष राजेशजी पांडे यांच्या संकल्पनेतून मोफत आरोग्य तपासणी शिबिर हे आळंदी ते पंढरपूर या श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमध्ये सुरू करण्यात आले आहे. वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी अद्यावत सुविधा यामध्ये उपलब्ध करण्यात आलेली आहे. तब्बल दहा हजार रुपयांच्या तपासण्या वारकऱ्यांच्या मोफत करण्यात येत आहेत.

यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांशी आमदार सचिन पाटील व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी संवाद साधला आहे.

सदरील कार्यक्रमास स्वराज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अभिजीत नाईक निंबाळकर, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष संदीप चोरमले, सद्गुरु हरिबुवा नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन तेजसिंह भोसले, भाजपाचे युवा नेते अमोल सस्ते, लायन्स क्लब गोल्डन सेलच्या अध्यक्ष सौ. स्वातीताई संदीप चोरमले, भाजपा तालुकाध्यक्ष बापूराव शिंदे, राजेंद्र निंबाळकर, रियाजभाई इनामदार, अजिंक्य बेडके, सौ. उषाताई राऊत यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यासोबतच चोरमले परिवारांनी विशेष मेहनत घेतलेली होती.


Back to top button
Don`t copy text!