माजी खासदार रणजितसिंह यांनी विधानसभेसाठी बोलावला कार्यकर्ता मेळावा


दैनिक स्थैर्य | दि. ७ ऑक्टोबर २०२४ | फलटण | भारतीय जनता पार्टीचे नेते तथा माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांचा जाहीर मेळावा हा हॉटेल निसर्ग येथे उद्या मंगळवार दि. ०८ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता सुरवडी येथील हॉटेल निसर्ग येथे आयोजित केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीबाबत फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी विचार विनिमय करण्यासाठी व कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्यास माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व जेष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे – पाटील यांची प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे. तरी तालुक्यातील सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी, आघाडी मोर्चा, महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन मंडल अध्यक्ष बजरंग गावडे व अमोल सस्ते यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!