
स्थैर्य, फलटण, दि. 13 सप्टेंबर: वीर धरण परिसरात एका अज्ञात व्यक्तीचा अपघात झाल्याचे निदर्शनास येताच, त्याच मार्गावरून प्रवास करणारे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आपला ताफा तात्काळ थांबवून अपघातग्रस्त व्यक्तीला मदत केली. त्यांनी गाडीतून खाली उतरून स्वतः अपघातग्रस्त व्यक्तीला ॲम्बुलन्समध्ये बसवून पुढील उपचारासाठी रवाना केले.
मिळालेल्या माहितीनुसार, वीर धरण परिसरात एका अज्ञात व्यक्तीचा अपघात झाला होता. याचवेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा ताफा तेथून जात होता. अपघात झाल्याचे पाहताच त्यांनी चालकाला गाडी थांबवण्यास सांगितले. त्यांनी स्वतः गाडीतून उतरून अपघातग्रस्त व्यक्तीची विचारपूस केली आणि उपस्थितांच्या मदतीने त्या व्यक्तीला ॲम्बुलन्समध्ये बसवले. पुढील उपचारासाठी त्यांना तातडीने रुग्णालयात पाठवण्याची व्यवस्था केली.
वेळेवर मदत मिळाल्याने अपघातग्रस्त व्यक्तीला मोठा दिलासा मिळाला. ऐनवेळी आपला ताफा थांबवून एका सामान्य नागरिकाला मदत केल्याबद्दल माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या या कृतीचे आणि सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.