दैनिक स्थैर्य | दि. 11 जानेवारी 2025 | फलटण | माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांनी फलटण शहरासह तालुक्यातील नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तालुक्यामध्ये प्रथमच “जनता दरबार” भरवला आहे. काल संपन्न झालेला “जनता दरबार”मध्ये फलटण शहरासह तालुक्यातील शेकडो नागरिकांच्या विविध अडीअडचणी ह्या जागीच सुटल्या आहेत. ज्यांच्या अडीअडचणी आता सुटल्या नाहीत अश्यांच्या अडीअडचणी ह्या आगामी काही दिवसातच म्हणजे पुढील महिन्यातील “जनता दरबार” पूर्वी नक्की सोडवल्या जातील; असा विश्वास महाराजा मल्टीस्टेटचे व्हाईस चेअरमन तथा युवा नेते रणजितसिंह भोसले यांनी व्यक्त केले.
काल शुक्रवार दि. १० जानेवारी फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा “जनता दरबार” संपन्न झाला. यामध्ये सर्वात विशेष बाब म्हणजे सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी व त्यांचे सहाय्यक अधिकारी हे एकाच ठिकाणी उपस्थित होते. त्यामुळे विभागाच्या अंतर्गत होणारी टोलवा टोलवी सुद्धा याठिकाणी अधिकारी एकत्रित असल्याने मार्गी लावण्याचे काम माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांनी केले आहे; असे मत सुद्धा यावेळी रणजितसिंह भोसले यांनी व्यक्त केले.
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील हे फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा नियमित जनता दरबार आयोजित करणार आहेत. आताच्या जनता दरबारामध्ये ज्यांना आपले अर्ज मांडता आले नाहीत; अश्यानी पुढील जनता दरबाराची माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या महाराजा मंगल कार्यालयाच्या शेजारी असणाऱ्या संपर्क कार्यालयात अडचणीनुसार आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित प्रतींसोबत अर्ज जमा करावेत; असे आवाहन सुद्धा यावेळी रणजितसिंह भोसले यांनी केले आहे.
४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे
फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.
संपर्क : 8888006611 (WhatsApp)