राष्ट्रवादीचे फुटलेले आमदार शरद पवार, जयंत पाटील यांच्या संपर्कात : माजी गृहमंत्री अनिल देशमुख


दैनिक स्थैर्य | दि. ३ जुलै २०२३ | कराड |
रविवारी अजित पवार यांच्याबरोबर शपथविधीला असणारे राष्ट्रवादीचे अनेक आमदार पुन्हा शरद पवार व जयंत पाटील यांच्या संपर्कात आहेत. येत्या २ दिवसात हे सगळेच चित्र स्पष्ट होईल, असे वक्तव्य राज्याचे माजी गृहमंत्री आ. अनिल देशमुख यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींविषयी बोलताना केले.

कराड येथील सर्किट हाऊस येथे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा करण्यासाठी आले असताना देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे विधान केले.


Back to top button
Don`t copy text!