अजित पवार म्हणजे ‘राष्ट्रवादी पक्ष’ नव्हे : खा. शरद पवार


दैनिक स्थैर्य | दि. ३ जुलै २०२३ | सातारा |
राज्यातला तरुण हा वैचारिक बैठक असणारा आहे. मी या नव्या पिढीतील तरुणांसमवेत लोकांच्या मध्ये जाऊन नव्या उमेदीने उभा राहणार आहे. या नव्या कार्यकर्त्यांना संधी देत महाराष्ट्राचे चित्र पालटवणार आहे. त्यासाठी मी हा राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे, अशी घोषणा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांनी केली. तसेच पक्ष सोडून जे गेले आहेत, त्यांना माझा आशिर्वाद आहे; परंतु काहीजण संभ्रम निर्माण करत आहेत. त्यामुळे अजित पवार म्हणजे ‘राष्ट्रवादी पक्ष’ नव्हे, असा टोला शरद पवार यांनी लगावला.

राष्ट्रवादी पक्षाच्या फुटीनंतर शरद पवार हे आज सातार्‍यात आले असताना शासकीय विश्रामगृहात ते पत्रकारांशी बोलत होते. पवार यांनी आज कराडमधील प्रीतीसंगमावर जाऊन स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन आपला संघर्ष दौरा सुरू केला आहे.


Back to top button
Don`t copy text!