राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक फिरोज आतार भाजपात; खासदार रणजितसिंह यांच्या उपस्थितीत केला प्रवेश

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. १० डिसेंबर २०२२ । फलटण । राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे फलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक व शुक्रवार पेठ तालीम मंडळाचे अध्यक्ष फिरोज आतार व प्रीतम बेंद्रे (आबा) यांनी माढा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे.

2011 साली फिरोज आतार हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून फलटण नगरपरिषदेत नगरसेवक म्हणून निवडून गेले होते. तसेच फलटण मधील सर्वात मोठ्या शुक्रवार पेठ तालीम मंडळाचे अध्यक्ष असलेल्या फिरोज आतार यांना फलटण शहरात त्यांना मानणारा मोठा युवा वर्ग आहे. मितभाषी असलेले सर्वसामान्यांच्या मदतीला कायम धावून जाणारे व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख असून फिरोज आतार यांच्यासारखा चेहरा भारतीय जनता पार्टीत आल्यामुळे निश्चितच फलटण शहरातील भारतीय जनता पार्टीची ताकद वाढली असल्याचे मत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली पक्ष वाढीसाठी आपले पूर्ण योगदान देऊ व खासदार साहेब देताल ती जबाबदारी पूर्ण ताकतीने पार पाडू असे फिरोज आतार यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!