स्थैर्य, फलटण, दि. १६: सध्या फलटण शहरामध्ये कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. संक्रमित रुग्णांबरोबरच मृतांच्या संख्येतही मोठी वाढ दिसून येत आहे. ऑक्सिजनपासून ते औषधांपर्यंत सर्वच गोष्टींचा अभाव सगळीकडे आहे. दरम्यान, भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने कोरोना साथीच्या आजारात स्वत:ची काळजी घेण्यासाठी काही आयुर्वेदिक पद्धती सांगितल्या आहेत, ज्यापासून आपले संरक्षण होऊ शकते, अश्या इम्युनिटी बूस्टर असलेल्या गोळ्या ह्या माजी नगरसेविका सौ. विजयाताई अशोकराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक अशोकराव जाधव यांनी प्रभाग क्र. ४ मध्ये घरोघरी जावून वितरित केलेले आहे.
आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी किंवा अॅलोपॅथी या सर्वांनी शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यावर भर दिला आहे. जर शरीर रोगांविरुद्ध लढण्यास सक्षम असेल तर कोणताही रोग होणार नाही आणि आम्ही निरोगी राहू. आजारी पडल्यानंतर औषधोपचार करणे यापूर्वी आपण शरीर मजबूत बनवितो आणि आजारांपासून दूर रहाणे चांगले. यासाठी, आयुर्वेदात स्वत:ची काळजी घेण्याच्या पद्धतींचे वर्णन केले गेले आहे, जे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवते. अश्या इम्युनिटी बूस्टरच्या गोळ्या सर्वानी घेणे गरजेचे आहे, असेही नगरसेवक अशोकराव जाधव यांनी स्पष्ट केले.