छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, रायपूर 29 : छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचं प्रदीर्घ आजाराने आज निधन झालं. ते 74 वर्षांचे होते. ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना रायपूरमधल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. ९ मे रोजी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तेव्हापासून त्यांची  प्रकृती ढासळतच गेली.  काही दिवसानंतर त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आलं होतं. नंतर ते कोमात गेले होते.  आज त्यांना पुन्हा ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले.

त्यांच्या मेंदूला रक्तपुरवढा बंद झाला होता. त्यामुळे प्रकृती आणखी ढासळली होती. डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ केली पण त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत. गेली अनेक दिवस ते कोमातच होते. शरीरात इन्फेक्शन वाढल्याने अनेक अवयवांनी काम करणही बंद केलं होतं. रायपूरच्या नारायणा हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं होतं.

माजी IAS अधिकारी असलेले अजित जोगी यांनी काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. काँग्रेसमध्ये त्यांचा दबदबा होता. काही वर्षांपूर्वी माओवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. त्यात ते थोडक्यात बचावले होते. त्या अपघातानंतर त्यांना कायम व्हिलचेअरच्या मदतीनेच फिरावं लागत होतं.

काही वर्षांपूर्वी काँग्रेसमध्ये मतभेद झाल्याने त्यांनी आपला स्वतंत्र पक्ष काढला होता. मात्र त्याचा फारसा प्रभाव पडला नाही. नंतर राजकारणातही त्यांना फारसे यश मिळालं नाही.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!