स्थैर्य, फलटण, दि. २५: सध्या फलटण शहरासह तालुक्यामध्ये कोरोना बाधित रूग्णांची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. फलटण तालुक्यातील कोरोना बाधित रूग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना कोरोना काळामध्ये सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आदेश हे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिलेले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून फलटण तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आलेली आहे. बेड उपलब्ध, हॉस्पिटल माहिती, इंजेक्शनबाबत माहिती, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना माहिती, रुग्णालयाकडून जादा बिल आकारणी बाबत तक्रार निवारण केंद्र, लसीकरणाबाबत, कोविड सेंटर बाबत माहिती अश्या विविध प्रश्नांवर फलटण तालुका भाजपाचा टास्क फोर्स कार्यरत राहील, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांनी दिली.
नगरसेवक अशोक जाधव ७६२०४०८००२, नगरसेवक सचिन अहिवळे ९६२३२२३८८८, युवा नेते अभिजीत नाईक निंबाळकर, ९६०४६२२२२२, सुनील जाधव ९८३४८५३७०७, अमोल सस्ते ९९७५१९२६२६, राहुल शहा ९८५०२९४७९४, बजरंग गावडे ९८२२४०६२६०, सिराज शेख ९५२४९०२७८६, राजेश शिंदे ८१४९४४७८०४, राहुल आव्हाड ७०३०९३१३९७, अमित रणवरे ९९२३३३८३३४, नितिन जगताप ८६००६८२००२, धनंजय पवार, ९८८१७७९९११, सुशांत निंबाळकर ९४२३०८५५५, बाळासाहेब कदम ९१५८९७३३३८, नानसो इवरे ९८२३२६९०००, अनुप शहा ९६८९९४१००८ ही टीम कोरोना बाधितांच्या व कोरोना बाधित रूग्णांच्या नातेवाईकांना कशा पद्धतीने मदत करता येईल यासाठी कार्यरत राहणार आहे, असेही भाजपा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांनी स्पष्ट केले.
संघटनमंत्री मकरंद भाऊ देशपांडे, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, भाजपा उत्तर महाराष्ट्र संघटनमंत्री रवीजी अनासपुरे, जिल्हा प्रभारी सदाशिव खाडे, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन बैठक संपन्न झाली. यामध्ये माझा बुथ, कोरोना मुक्त बुथ, माझा बुथ लसीकरण युक्त बुथ या तत्वानुसार कार्यरत राहणार आहे, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.