दैनिक स्थैर्य | दि. ४ सप्टेंबर २०२३ | फलटण |
उपळवे (ता. फलटण) गावच्या हद्दीत काल सायंकाळी ४ वाजता नामदेव गुलाब माने यांच्या मक्याच्या शेतात राम गणेश बेदीया (वय ३०, व्यवसाय सेंटरिंग, मूळ रा. बनवाडी, ता. रांची, जि. रामगड, झारखंड, सध्या राहणार उपळवे, ता. फलटण) याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे.
या घटनेची नोंद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास सहा. फौजदार व्ही. शिंदे करत आहेत.