
दैनिक स्थैर्य | दि. १५ ऑक्टोबर २०२१ | सातारा | अंगापूर, ता. सातारा येथील विजय मोहन भिसे (वय ३६)याला बेकायदा दारूविक्री करताना सातारा तालुका पोलिसांनी पकडले. त्याच्या ताब्यातून सुमारे तीन हजार रुपयांच्या विदेशी दारूच्या १८० बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. विजय भिसे हा मजूर असून तो अंगापूरमधील प्रवीण कणसे यांच्या शेडच्या पाठीमागे दारूची विक्री करत होता. याचवेळी पोलिसांनी त्याला पकडले. त्याला सीआरपीसी नुसार नोटीस बजावण्यात आली आहे.