फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांकडून सक्तीची विज बिल वसुली थांबवावी; भाजपा तालुकाध्यक्ष बजरंग गावडे यांच्या मागणीवर महावितरणकडून हिरवा कंदील


दैनिक स्थैर्य । दि. २४ नोव्हेंबर २०२२ । फलटण । कृषी पंपांची विज बिल थकबाकी वसूल करण्यासाठी वीज वितरण कंपनीकडून शेतकऱ्यांना कोणती पूर्वकल्पना न देता विद्युत रोहित्र बंद केल्याने पिकांना पाणी देण्यासाठी गंभीर प्रश्न निर्माण झाला होता या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी आणि विज बिल सक्तीच्या वसुलीला शासनाने स्थगित दिले असून चालू विज बिल घेऊन शक्तीची वसुली थांबवावी कृषी पंपांची वीज तोडू नये असे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी दिल्याचे जाधवाडी सब स्टेशनची उपकार्यकारी अभियंता महाडिक यांनी दिली.

फलटण पूर्व भागातील केल्याने गहू पेरणीच्या हंगामामध्ये विद्युत रोहित्र बंद केल्याने पिकांना पाणी देण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला अशा परिस्थितीत वीज वितरण कंपनीने बंद करण्यात आलेली रोहित्र त्वरित सुरू करावीत यामागणी साठी गोखळी पाटी येथे पूर्व भागातील शेतकऱ्यांची व वीज वितरण कंपनीचे अधिकारी यांची बैठक भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष बजरंग गावडे यांनी बोलावली होती या बैठकीत महाडिक यांनी शासनाने सर्व रोहित्र सुरू करण्याचा निर्णय घेतला असून फलटण तालुक्यातील बंद करण्यात आलेली सर्व रोहित्र सुरू करण्यात येतील असे सांगितले.

अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्य महाडिक साहेब बोलत होते.

यावेळी बोलताना पै. बजरंग गावडे म्हणाले की, शेतकऱ्यांना कोणतीही पूर्व सूचना न देता डीपी बंद करणे चुकीची असून वीज वितरण कंपनीचे शेतकरी ग्राहक आहेत ग्राहकांना विश्वासात घेऊनच निर्णय होणे गरजेचे असताना ऐन गव्हाच्या, हरभरा, मका, सुर्यफूल पेरणीच्या हंगामामध्ये विद्युत रोहित्र बंद केल्याने पिकांना पाणी कसे द्यायचे असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला शेतकऱ्यांकडे असणारी वीजबिले ऊस, कापूस गेल्यावर भरण्यास तयार आहे सध्या शेतकऱ्यांकडे पैसे उपलब्ध नसल्याने तो भरू शकत नाही वीज वितरण कंपनीकडून येणारे बिले चुकीच्या पद्धतीने आकारले जातात वर्षे वर्ष शेतीमध्ये पिके नसून सुद्धा वीज बिले कोणत्या आधारावर वितरण कंपनीकडून शेतकऱ्यांना देतात पीकच नाही शेतात तर विज बिल कुठून भरणार शेतकरी याचा गांभीर्याने सरकारने आणि वीज वितरण कंपनीने विचार करण्याची गरज आहे असे सांगितले.

या कामी वीज वितरण कंपनीचे अभियंता खिल्लारे सोनवणे आवळे साहेब यांनी त्वरित विद्युत रोहित्र सुरू करून शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक केल्याबद्दल अभिनंदन केले.

यावेळी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या पुढे शेतकऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या या बैठकीस श्रीराम कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन बजरंग खटके, गोखळी विकास सोसायटीचे चेअरमन तानाजी बापू गावडे, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक तानाजी गावडे – पाटील, संतोष खटके, अनिल धुमाळ, दादासाहेब खटके, पांडुरंग गावडे आदी शेतकरी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!