कोरोनामुक्त झाल्यानंतर प्रथमच अजित पवार मंत्रालयात


 

स्थैर्य, मुंबई, दि.१०: राज्याचे
उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोनामुक्त झाल्यानंतर अ‍ॅक्शन मोडमध्ये आले
आहेत. कोरोनामुक्त झाल्यानंतर अजित पवार यांनी आज मंत्रालयात हजेरी लावत
कामकाजाला सुरुवात केली आहे. कोरोनानंतर अजित पवार पहिल्यांदाच मंत्रालयात
दाखल झाले होते. खासदार सुप्रिया सुळे आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
यांनी फेसबूक लाईव्ह करत ही माहिती दिली आहे. अजित पवार कोरोनामुक्त झाले
होते त्यावेळी देखील सुप्रिया सुळे यांनी व्हॉटसअ‍ॅप स्टेटस ठेवत सर्वांचे
आभार मानले होते.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार
कोरोनामुक्त 2 नोव्हेंबरला कोरोनामुक्त झाले होते. त्यानंतर 7 दिवस आराम
केल्यानंतर अजित पवार यांनी कामाला सुरुवात केली आहे. अजित पवारांना 26
ऑक्टोबरला कोरोनाची लागण झाली होती. रुटीन चेकअपसाठी अजित पवार यांना
मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता त्यांचा कोरोना
चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांच्यावर ब्रीच कॅण्डी
रुग्णालयात उपचार सुरु होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!