
दैनिक स्थैर्य | दि. 05 ऑगस्ट 2024 | फलटण | धोम – बलकवडी धरणांमधून नदी मध्ये सोडण्यात येणाऱ्या पाणी हे फलटण तालुक्याच्या दक्षिण भागासाठी पाणी सोडण्यात यावे अशी मागणी फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र दूडी यांच्याकडे केली होती. प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या विनंतीस मान देवून जिल्हाधिकारी जितेंद्र दूडी यांनी धोम – बलकवडीच्या कालव्या मधून पाणी सोडण्यात येणार आहे.
याबाबत जिल्हाधिकारी डुडी यांनी धोम धरणाच्या अभियंत्यांना निर्देश दिले आहेत. फलटण तालुक्याच्या दक्षिण भागांतील ओढे, तलाव, साठवण तलाव या अतिरिक्त पाण्याने भरून घ्यावे जेणेकरून दुष्काळाची परिस्थिती राहणार नाही तसेच पाण्याची पातळी वाढून पिकांना मदत होईल; असे मत यावेळी ढोले यांनी व्यक्त केले.