करोनासाठीच्या अन्नछत्रास के. बी. चा मदतीचा हात

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

स्थैर्य, फलटण: करोना या जीवघेण्या आजारामुळे उध्वस्त झालेले जनजीवन विस्कळीत होउ नये, यासाठी सुरु असणार्‍या अन्नछत्रासाठी के. बी. एक्सपोर्टस कंपनीचे संचालक सचिन यादव यांनी त्या बाबत आस्थेवायिकपणे चौकशी केली व अन्न छत्रास सुमारे 2 टन (2000 किलो) तांदूळ देऊन भरीव मदत केली. तसेच हा उपक्रम सुरु रहावा तसेच लॉकडाउन वाढला तरी आपण मदत करण्याची भूमिका जाहीर केली.

कै. लोकनेते हिंदुरावजी नाईक निंबाळकर यांचे स्मरणार्थ खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नछत्र सुरू असून त्या मधून फलटण शहर व परिसरामध्ये सुमारे 5000 लोक त्याचा लाभ घेत आहेत.

या अन्नछत्रा मूळे अनेकांची सोय होत असून हे अन्नछत्र सोशल डिस्टन्स राखून मदत करत आहे.

या अन्नछत्रा बाबत माहिती समजताच के. बी. एक्सपोर्टस कंपनीचे संचालक सचिन यादव यांनी त्या बाबत आस्थेवायिकपणे चौकशी केली व अन्न छत्रास सुमारे 2 टन (2000किलो) तांदूळ देऊन भरीव मदत केली. तसेच हा उपक्रम सुरु रहावा तसेच लॉकडाउन वाढला तरी आपण मदत करण्याची भूमिका जाहीर केली.

के बी एक्सपोर्टस तर्फे जनसंपर्क अधिकारी संदीप शिंदे यांनी कंपनीच्या इतर कर्मचारी वर्गाला बरोबर घेऊन मदत पोहच केली, त्यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी के बी एक्सपोर्टस कंपनीचे संचालक सचिन यादव साहेबांचे आभार मानले.

सामाजिक जाणिवेतून नेहमीच करत असलेल्या कार्याचा खास उल्लेख करून  इतरांनी आदर्श घेण्याची सूचना केली, यावेळी अन्नछत्रचे समन्वयक विरोधी पक्ष नेते समशेरबहाद्दूर नाईक निंबाळकर गटनेते अशोक जाधव, नगरसेवक सर्वश्री सचिन अहिवळे, खरात, अभिजित नाईक निंबाळकर, ऋषीराज नाईक निंबाळकर, डॉक्टर प्रवीण आगवणे, सचिन कांबळे पाटील, के बी एक्सपोर्टस तर्फे संदीप शिंदे, हेमंत खलाटे पाटील, योगेश यादव, प्रवीण नाळे उपस्थित होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!