दैनिक स्थैर्य | दि. १४ जुलै २०२४ | सातारा |
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात शनिवारपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढत असून गेल्या २४ तासात सुमारे ५ टीएमसीने पाणीसाठा वाढला आहे. असाच पाऊस सुरू राहिला तर आठवडाभरातच धरण अर्धे भरेल.
दरम्यान, फलटण तालुक्यातही कालपासून पाऊस सुरू असून तालुक्याला पाणीपुरवठा करणार्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे वीर, भाटघर, नीरा-देवघर धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे.