फ्लिपकार्ट सेल: आयफॉल्कनची स्मार्ट टीव्हीवर आकर्षक सवलत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

४के क्यूएलईडी आणि युएचडी टीव्ही ५० टक्क्यांपर्यंतच्या सवलतीत उपलब्ध 

स्थैर्य, मुंबई, १६ : सण-उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असताना, टीसीएलचा सब ब्रँड असलेल्या आयफॉल्कनने फ्लिपकार्टवरील आगामी बिग बिलियन डेज आणि बिग दिवाली सेलसाठी स्मार्ट टीव्हींवर ५० टक्क्यांपर्यंतची सवलत जाहीर केली आहे. विक्रीच्या या जोरदार उत्सवात या टीव्ही ब्रँडने ४के  क्यूएलईडी टीव्ही (५५-इंच) ५१,९९९ रुपयांना; (६५-इंच) ६९,९९९ रुपयांना आणि के७१-४के युएचडी टीव्ही (४३-इंच, ५५- इंच आणि ६५- इंच) अनुक्रमे २५,९९०, ३५,९९९ आणि ५३,४९९ रुपयांना सादर केला आहे. उत्सवात आनंद आणि उत्साह वाढवण्यासाठी ब्रँडने आणखी एक नवे यूएचडी मॉडेल के६१-४के युएचडी आणले असून ते २२,९९० रुपयांच्या आकर्षक किंमतीत उपलब्ध आहे. सवलतीत उपलब्ध स्मार्ट टीव्ही मॉडेलमध्ये क्वांटम डॉट, हँड्सफ्री व्हॉइस कंट्रोल, डॉल्बी व्हिजन आणि अॅटमॉससह अत्याधुनिक सुविधांचा समावेश आहे.

आयफॉल्कनचे अधिकारी म्हणाले, ‘भारतीय नागरिक प्रचंड उत्साही असून सणासुदीच्या काळात किफायतशीर किंमत व ऑफरच्या शोधात असतात. ग्राहकांची ही गरज समजून घेत, ती पूर्ण करण्यासाठी आयफाल्कनने अप्रतिम सवलतींत उत्कृष्ट स्मार्ट टीव्हीची रेंज आणली आहे. यात अद्याप लाँच न केलेल्या एका टीव्हीचाही समावेश आहे. या सवलतींनी ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण होतील, त्यांच्या गरजा आणि बजेटसाठी ही उत्पादने परिपूर्ण भासतील अशी आम्हाला आशा आहे.’

हँड्स-फ्री एआयसह एच-७१- ४के क्यूएलईडी : मेटलिक बॉडी असलेल्या या मॉडेलमध्ये फुल-स्क्रीन पाहण्याचा अत्यंत खरा आनंद मिळवण्यासाठी बेझल-लेस डिझाइन आहे. क्वांटम डॉट टेक्नोलॉजी आणि डॉल्बी व्हिजनद्वारे अवर्णनीय रंगसंगती आणि स्क्रीन ब्राइटनेस मिळतो. याद्वारे पारंपरिक मॉडेलपेक्षा डिस्प्ले क्वालिटी खूप समृद्धी दिसते. या मॉडेलमध्ये डॉल्बी अॅटमॉस हे आणखी एक तंत्रज्ञान असून याद्वारे विलक्षण आणि सुस्पष्ट मनोरंजनासाठी चित्रपटगृहातील कंटेंट अत्यंत उत्कृष्ट ध्वनीत सादर केला जातो. 

हँड्स फ्री एआयसह के७१- ४के युएचडी : मेटलिक बॉडी आणि स्लिम डिझाइन असलेले हे उपकरण पारंपरिक एलईडी टीव्हीपेक्षा आकर्षक दिसते. रुम डेकोरेशनसाठी हे उत्कृष्ट मॉडेल असून एखाद्या भिंतीवर शोपीसप्रमाणे तो लावता येतो. मग चालू असो वा बंद स्थितीत. या मॉडेलमध्ये डायनॅमिक कलर एनहान्समेंट सुविधा असून याद्वारे अधिक उत्साही, प्रीमियम व्हिडिओ अनुभव देण्याकरिता पारंपरिक पॅलेटच्या मर्यादा वाढवण्याकरिता यात अल्गोरिदमचा वापर करण्यात येतो.

अमर्याद मनोरंजनासाठी के६१-४के युएचडी : आयफॉल्कनच्या सध्याच्या पोर्टफोलिओत नव्याने समाविष्ट झालेल्या के६१ मध्ये अँड्रॉइड टीव्ही सिस्टिम असून २० पेक्षा जास्त प्री इन्स्टॉल्ड कंटेंट अॅप आहेत. याद्वारे यूझरला अमर्याद कंटेंटचा आनंद मिळतो तसेच आवाजी नियंत्रणाद्वारे जगाची सैर करता येते. असंख्य प्रकारचे अॅप आणि स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मसद्वारे नवे कार्यक्रम, चित्रपट पाहता येतात, नवे शोधही लावता येतात. के६१ च्या मदतीने यूझरचा घरातील वेळ अधिक चांगल्या पद्धतीने वापरला जाऊ शकतो, जे आतापर्यंत शक्य नव्हते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!