दैनिक स्थैर्य | दि. 15 ऑगस्ट 2024 | फलटण | स्वातंत्र्य दिनानिमित्त महात्मा शिक्षण संस्था संचलित मूकबधिर विद्यालयांमध्ये फलटण पंचायत समितीचे माजी सभापती माननीय श्री शंकरराव माडकर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला याप्रसंगी नगर परिषदेचे माजी नगरसेवक मिलिंद आप्पा नेवसे, फलटण पंचायत समितीचे माजी उपसभापती विवेक शिंदे, युवा विधीज्ञ ॲड. ऋषिकेश काशीद, अतुल मोरे, महात्मा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष दादासाहेब चोरमले इत्यादी मान्यंवर याप्रसंगी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मूकबधिर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.वैशाली शिंदे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून विद्यालयाच्या कामकाजाचे माहिती दिली.
यावेळी बोलताना शंकरराव माडकर म्हणाले की, महात्मा शिक्षण समितीच्या माध्यमातून चालवण्यात येणारे दिव्यांग मुलांच्या शाळेची प्रगती पाहून खूप धन्य झालो या विद्यालयाच्या उभारणीमध्ये संस्थेचे कार्याध्यक्ष दादासाहेब चोरमले व सचिव सौ. वैशाली चोरमले यांनी स्वतःच्या खिशातील रक्कम घालून या विद्यालयाची जागा खरेदी केली आहे. या जागेतील उभी केलेली सुसज्ज इमारत उभारणी करण्यासाठी मोलाचा वाटा उचलला असल्याचे दिसून येते त्यांचे दिव्यांग क्षेत्रातील कार्य निश्चितच समाजाला प्रेरणादायी असून अनेक जण शैक्षणिक संस्था काढतात मात्र दादासाहेबांनी समाजातील उपेक्षित दुर्लक्षित अशा दिव्यांग क्षेत्रात काम करणारी संस्था उभी करून एक आगळावेगळा आदर्श निर्माण केला असल्याचे शेवटी माडकर म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. विजया मठपती यांनी केले.
कार्यक्रमास हेमा गोडसे मॅडम, उदय निकम, चैतन्य खरात, निर्मला चोरमले, नितेश शिंदे यांच्यासह अनेक पालक वर्ग विद्यार्थी उपस्थित होते.