दैनिक स्थैर्य | दि. १६ ऑगस्ट २०२३ | फलटण |
इंग्रजांच्या जुलमी राजवटीमधून १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले व दीडशे वर्ष फडकवला जाणारा इंग्रजांचा ध्वज खाली घेऊन भारतीय तिरंगा सर्वत्र फडकू लागला. म्हणून १५ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय उत्सव म्हणून सर्व देशभर मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर महात्मा शिक्षण संस्था संचलित मूकबधिर विद्यालयामध्ये संगिनी फोरमच्या अध्यक्षा अपर्णा जैन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी महात्मा शिक्षण संस्थेच्या सचिव सौ. वैशाली चोरमले, संगिनी फोरमच्या सेक्रेटरी प्रज्ञा दोषी, संगिनी फोरम माजी अध्यक्षा निना कोठारी, जयश्री उपाध्ये, अलका पाटील, खजिनदार मनीषा घडीया, संगिनी फोरमच्या संचालिका सारिका दोषी, पौर्णिमा शहा, सुनिता उपाध्य. वर्षा गांधी, दीपिका व्होरा आदी उपस्थित होत्या.
याप्रसंगी संगिनी फोरमच्या यांच्यावतीने मूकबधिर मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर महात्मा शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मूकबधिर मुलांची वसतिगृहासाठी ११० किलो गहू, ३० किलो साखर, एक जेमिनी तेलडबा, हरभरा डाळ, मूग डाळ, चहा पावडर, मिरची पूड, पोहे, बिस्किट पुडे, चॉकलेटचे संगिनीच्या सदस्या व मंगेशभाई दोशी यांच्या सहकार्याने वाटप करण्यात आले.
फलटण शहरामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणार्या संघटनांपैकी एक संगिनी फोरम ही संस्था असून त्यांच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात.