दैनिक स्थैर्य | दि. १५ ऑगस्ट २०२४ | फलटण |
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त संगिनी फोरम फलटणच्या अध्यक्षा अपर्णा जैन यांच्या हस्ते श्रीमंत मालोजीराजे प्राथमिक विद्यामंदिर येथे ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव डॉ. सचिन भैय्या सूर्यवंशी बेडके, उपाध्यक्ष पवार सर, संगिनी फोरमच्या संस्थापक अध्यक्षा स्मिता शहा, सचिव प्रज्ञा दोशी, माजी अध्यक्षा नीना कोठारी, संगिनी सदस्या जयश्री उपाध्ये, वृषाली गांधी, संध्या महाजन, संगीता जैन, नेहा दोशी, सुरेखा उपाध्ये उपस्थित होत्या.
याप्रसंगी विद्यार्थ्यांना जिलेबीचे वाटप करण्यात आले. संगिनी फोरमकडून प्रशालेस खुर्च्या भेट देण्यात आल्या.