पाच वर्षाचे अपयश लुंगीमध्ये लपविण्याचा प्रयत्न; आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची खोचक टीका

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.१७ जानेवारी २०२२ । सातारा । साताराचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पुष्पा चित्रपटातील नायकाप्रमाणे लुंगी घालून फोटो शुट केले होते. या फोटो शुटवर आता टीका होत आहे. पाच वर्षांच्या कामाचे अपयश लुंगीमध्ये लपवण्याचा प्रयत्न उदयनराजे करत असल्याची खोचक टीका आमदार शिवेंद्रराजे यांनी उदयनराजेंवर केली. या टीकेला आता ते काय प्रतिउत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

पुष्पा चित्रपटाची संपुर्ण देशभरात क्रेझ आहे. त्यात आता या सिनेमाने खासदार उदयनराजे भोसले यांनाही भूरळ पाडली. त्यामुळे या सिनेमातील नायकाप्रमाणे खासदार उदयनराजे यांनी पोवई नाक्यावरील सेल्फी पॉईंट येथे लुंगी घालून फोटो सेशन केले. या फोटो सेशनवर आता आमदार शिवेंद्रराजे यांनी टीका केली आहे.

मी उभारलेल्या कामाच्या प्रेमात उदयनराजे पडले आहेत हे चांगले आहे.उदयनराजेंच्या कामाच्या प्रेमात कोण पडेल अशी काम त्यांच्याकडे नाहीत.आपण केलेल्या पाच वर्षांच्या कामाचे अपयश हे लुंगी मध्ये लपवण्याचा प्रयत्न उदयनराजे करत असल्याची खरमरीत टीका शिवेंद्रराजे यांनी केली.

सातारकरांनी त्यांच्याकडे मनोरंजन म्हणून बघावे.राजकीय लोकांना देखील आता फॅन्सी ड्रेस पार्टी करावी लागत आहे हा गंमतीचा भाग असल्याचे सांगत उदयनजेंच्या लुंगी घालून केलेल्या फोटो सेशनवर शिवेंद्रराजेंनी चांगलीच टीका केली आहे.


Back to top button
Don`t copy text!