येरवडा कारागृहातील पाच कैदी फरार


स्थैर्य, पुणे, 16 : कोरोना आणि लॉकडाऊन असताना पुण्यातील येरवडा कारागृहातून 5 कैदी पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे कैदी गज कापून पळून गेल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. देवगण अजिनाथ चव्हाण, गणेश अजिनाथ चव्हाण, अक्षय कोंडक्या चव्हाण, अंजिक्य उत्तम कांबळे, सनी टायरन पिंटो अशी फरार झालेल्या कैद्यांची नावे आहेत.

या प्रकरणी येरवडा पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू असून या फरार झालेल्या कैद्यांचा शोध सुरू आहे. हे कैदी गज कापून पळून गेले आहेत. त्यांच्याकडे गज कापण्यासाठी धारदार शस्र कुठून आलं आणि त्यांना कोणी मदत केली का यासंदर्भातही चौकशी केली जाणार आहे.

येरवडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास जात पडताळणी कार्यालयाच्या परिसरातील तात्पुरत्या कारागृहाच्या इमारतीमधील खोलीचे गज तोडून हे 5 कैदी फरार झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच तात्काळ वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!