कराडातील वाढीव पाच टक्के घरपट्टी रद्द करावी : यशवंत जनशक्ती आघाडी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, कराड, दि.3 : कराड शहरात नगरपालिकेने 2020 या आर्थिक वर्षात पाच टक्के वाढवलेली घरपट्टी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर घरपट्टी रद्द करावी,  त्याबाबतचा प्रस्ताव यशवंत जनशक्ती आघाडीने दिला आहे, अशी माहिती आघाडीचे गटनेते राजेंद्रसिंह यादव यांनी दिली. ही वाढीव पाच टक्के घरपट्टी रद्द झाल्यास सुमारे 19 हजार मिळकतदारांची चिंता मिटणार आहे.

कराड शहरात रहिवाशी आणि वाणिज्य वापरात असलेल्या सुमारे 19 हजार मिळकती असून या मिळकतींवर आकारल्या जाणार्‍या संकलीत करात पाच टक्के वाढ कराड नगरपालिकेने केली होती. चालू आर्थिक वर्षातील कालावधीत आकारण्यात येणारी ही वाढीव घरपट्टी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रद्द करावी, अशी शिफारस यशवंत विकास आघाडीने केली आहे. त्यांनी मांडलेल्या उपसूचनेनुसार त्याचा प्रस्तावही दिला जाणार असल्याने शहरातील मिळकतदारांना दिलासा मिळाला आहे.

राजेंद्रसिंह यादव म्हणाले, लॉकडाउनमुळे शहरातील नागरिकांना मोठ्या आर्थिक गोष्टीशी सामना करावा लागत असल्याने पाच टक्के करवाढ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. आरोग्य विभागाच्या तृतीय श्रेणीतील कर्मचार्‍यांना 3 हजार रुपये तर चतुर्थ श्रेणीतील कर्मचार्‍यांसाठी 6 हजार रुपये प्रोत्साहनपर भत्ता दिला जाणार आहे. शारदा क्लिनिक व सह्याद्री हॉस्पिटल येथे त्यांची आरोग्य तपासणी विनामूल्य केली जाणार आहे. कराड नगरपालिकेतील नगराध्यक्षा, उपाध्यक्षांसह सर्व सभापती, नगरसेवकांचे एप्रिल-पासूनचे मानधन, बैठकीचा संपूर्ण भत्ता पंचवार्षिक संपेपर्यंत आपत्कालीन व्यवस्थेसाठी जनरल फंडात वर्ग करावा. त्याचाही प्रस्ताव दिला असून त्यासही एकमुखी मंजुरी मिळाली आहे. कोरोनाच्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जिल्ह्यात सातारा व कराड अशा दोन स्मशानभूमी आहेत. त्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करणार्‍या कर्मचार्‍यांना आंघोळी-साठी गरम पाण्याची सोय आणि तेथेच त्यांना सॅनिटायझिंगही करण्यात येईल. रुग्णवाहिका व शववाहिका ही दोन्ही वाहने तत्काळ खरेदी करण्यात येणार आहेत. त्याच्या खर्चासाठी तत्काळ मंजुरी देण्यात आली आहे. आरोग्य कर्मचार्‍यांना विमा संरक्षण देण्याचा महत्त्वाचा निर्णयही घेण्यात आला आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!