दैनिक स्थैर्य । दि.०८ फेब्रुवारी २०२२ । कोरेगाव । शहरात जुन्या पेठेत कठापूर रस्त्यालगत ओंकार बॉडी बिल्डर्स यांच्या वर्कशॉपशेजारी महावितरण कंपनीच्या वीज वाहिन्यांमध्ये सोमवार दि. ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी अचानक शॉर्टसर्किट झाल्याने लागलेल्या आगीत चार ते पाच शेतकर्यांचा सुमारे पाच एकर क्षेत्रावरील ऊस जळाला, या आगीत ठिबक सिंचन यंत्रणेचे मोठे नुकसान झाले. शेतकर्यांनी प्रसंगावधन राखत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र वार्यामुळे आग भडकतच गेली.
शेतकरी विलासराव शंकरराव बर्गे, शंकरनाना बर्गे, भानुदास सुतार, पंढरीनाथ सुर्यवंशी, दिलीप वामन बर्गे, यांचे पाच एकर क्षेत्रावर ऊस पीक आहे. सोमवारी महावितरण कंपनीच्या वीज वाहिन्यांमध्ये सायंकाळी अचानक शॉर्टसर्किट झाले, त्यातून लागलेल्या आगीत ऊस व ठिबक सिंचन यंत्रणा जळाली. बर्गे, सुर्यवंशी कुटुंबियांसह लगतचे शेतकरी व युवक कार्यकर्त्यांनी प्रसंगावधन राखत आग आटोक्यात आणली.