दैनिक स्थैर्य | दि. 15 मार्च 2024 | फलटण | आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महायुती अर्थात भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेना यांच्या वतीने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाच पुन्हा लोकसभेचे तिकीट मिळाले आहे. आज किंवा उद्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. तरीही महाविकस आघाडीच्या वतीने अजूनही अधिकृत उमेदवार ठरत नाही.
महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांना शरद पवार यांनी माढा लोकसभेची ऑफर दिली असल्याचे समजत आहे. त्याबाबत अजूनही कोणता निर्णय झाला नाही.