
दैनिक स्थैर्य । 4 जून 2025। फलटण । येथील जैन सोशल ग्रुपच्या सदस्यांच्या सहकार्याने व योगदानाने पालवी संस्थेस भरीव आर्थिक मदत करण्यात आली.
पंढरपूर येथे गेली 24 वर्षापासून अनाथ व विशेष बालकांसाठी व वृद्धांसाठी कार्यरत असलेल्या पालवी संस्थेमधील 100 मुलांची सहल फलटण येथे आली होती. नवल बाई मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात पालवीतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यावेळी पालवी संस्थेतील सर्व मुलांची जेवणाची सोय जैन सोशल ग्रुपच्या वतीने करण्यात आली.
यावेळी 10वी,12 वी व सीबीएसईमध्ये यश संपादन केलेल्या दीक्षा शहा (97.2%), .सिया दोशी (95%), सिमरण गांधी (94.2%), जय रणदिवे (93.60%), स्वरा शहा (93%) यांच्यासह1 विद्यार्थी – विद्यार्थिनी यांचा सन्मानपत्र व मोत्याची माळ देऊन सत्कार करण्यात आला. संस्थेच्या सहसंस्थापिका डिंपलताई घाडगे यांनी पालवी संस्थेच्या कार्याची ओळख करुन देऊन व संस्थेस आर्थिक मदतीचे आवाहन केले.
यावेळी जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष श्रीपाल जैन, सचिव निना कोठारी, पालवी संस्थेच्या सह संस्थापिका डिंपलताई घाडगे, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया फलटण सेंटरचे अध्यक्ष महेंद्र जाधव, श्रीराम बझारचे संचालक तुषार गांधी, श्री चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिरचे अध्यक्ष अनिलकाका शहा (वडुजकर) सराफ, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मंगेशशेठ दोशी, कांदा व भुसार असोसिएशनचे सचिव धिरेन शहा, जैन सोशल ग्रुपचे उपाध्यक्ष प्रीतम शहा, माजी अध्यक्ष राजेंद्र कोठारी, सह सचिव हर्षद गांधी, संचालक अतुल कोठाडिया, मेंबरशिप ग्रोथ चेअरमन डॉ. अशोक व्होरा व जैन सोशल ग्रुपचे सदस्य, पालक उपस्थित होते.
अध्यक्ष श्रीपाल जैन यांनी जैन सोशल ग्रुपच्यावतीने पालवी संस्थेस सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल असे सांगितले. उपाध्यक्ष प्रीतम शहा यांनी पालवी संस्थेबद्दल विस्तृत माहिती दिली. या कार्यक्रमासाठी सौ.पुजा भुता, सौ. प्रज्ञा दोशी यांचे सहकार्य लाभले. ओम जैन व पुजा भुता यांनी सूत्रसंचालन केले. सचिव निना कोठारी यांनी आभार मानले.