‘बार्टी’मार्फत राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांना यूपीएससी नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणी परीक्षा २०२० साठी आर्थिक सहाय्य योजना

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि.०१: महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीचे जे उमेदवार केंद्रीय  लोकसेवा आयोग- नागरी सेवा  व्यक्तिमत्व चाचणी 2020 साठी पात्र ठरले आहेत अशा उमेदवारांना एकरकमी आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी आर्थिक सहाय्य योजना पुढीलप्रमाणे आहे.

योजनेचे स्वरूप :- पात्र अनुसूचित जातीच्या उमेदवारांना एकरकमी रक्कम रु. 25,000/- आर्थिक सहाय्य बार्टीमार्फत दिले जाईल.

पात्रता :-

  1. उमेदवार महाराष्ट्रातील रहिवासी व अनुसूचित जातीचा असावा.
  2. उमेदवार केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणी परीक्षा-2020 करिता पात्र असावा.

अर्ज करण्यासाठी-

  1. बार्टीच्या संकेतस्थळावरील फॉर्म भरावा.
  2. अर्जासोबत जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र, डोमेसाईल प्रमाणपत्र, DAF, उमेदवारांचे बँक खाते क्र. (पासबुकच्या प्रथम पृष्ठाची प्रत) व त्यासोबत संघ लोकसेवा आयोग- नागरी सेवा मुख्य परीक्षा 2020 चे प्रवेश पत्र (Admit Card) इ. च्या स्व-साक्षांकित प्रती अपलोड कराव्यात. कागदपत्र स्व-साक्षांकित असणे बंधनकारक आहे.
  3. फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक- दि. 20 एप्रिल 2021. पात्र उमेदवारांनी अधिक माहिती साठी ०२०-२६३४ ३६00/२६३३ ३३३९ येथे संपर्क साधावा.

फॉर्म करण्यासाठी लिंक- http://barti.maharashtra.gov.in NOTICE BOARD> BARTI-UPSC-Civil Services Personality Test 2020 Online Application Form

बार्टी मार्फत पात्र विद्यार्थ्यांसाठी Mock Interview घेतले जाईल. याबाबत सविस्तर सूचना ई-मेल द्वारे कळविण्यात येईल असे बार्टीमार्फत प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!