दैनिक स्थैर्य | दि. २ नोव्हेंबर २०२४ | फलटण |
दीपावली वसुबारसचे शुभमुहूर्ताचे औचित्य साधून शिखर शिंगणापूर कोथळे येथे पर्यावरण, निसर्गप्रेमी रोहित रक्षिता या भावंडांनी देशी गाय गोसंवर्धन करण्याच्या दृष्टीकोनातून मुंगी घाट, विसावा तळ पठारावर सुरू केलेल्या गोशाळेला क्रांतीसूर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष यांनी भेट देऊन गायींच्या चार्यासाठी आर्थिक मदत केली.
यावेळी क्रांतीसूर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद नेवसे म्हणाले की, बर्याचदा दिवाळीनंतर आपल्या माणदेशी दुष्काळी भागात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होते. या काळात चारा व पाण्याच्या टंचाईमुळे मुक्या जनावरांची उपासमार होते. त्यांना उपजिविकेसाठी मोठा संघर्ष करावा लागतो, या पार्श्वभूमीवर आम्ही देशी गायींना पोटभर खायला चारा मिळावा, हा उद्देश ठेवून गोशाळेला मदत केली आहे. गोमातेची सेवा ही ईश्वरसेवा समजून गायींची सेवा समाजातील प्रत्येकाने केली पाहिजे.