दैनिक स्थैर्य । दि.०३ मे २०२२ । बारामती । तालुक्यातील गुणवडी येथील सोमनाथ भिसे याना गालाचा कॅन्सर झाला आहे गाला मध्ये गाठ झाल्यावर मित्र परिवाराच्या वतीने आर्थिक मदतीने त्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली परंतु या पुढे पुढील उपचार करण्यासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता आहे सोमनाथ भिसे हे शेती मध्ये मजुरी करतात त्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने संपत कानतोंडे,पम्प गावडे,सतीश गावडे,पोपट केसकर,विशाल गावडे,रवी घोडे,संदीप गावडे,अंबादास गावडे,वैभव आटोळे आदी नी मदत केली तरीही अजून मदतीची आवश्यकता असल्याने समाज्यातील दानशूर व्यक्तींनी सोमनाथ भिसे याना मदत करावी असेही आव्हान मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.