अखेर टी. सी. कॉलेज लगतच्या रस्त्याचे काम सुरू

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २१ ऑगस्ट २०२३ | बारामती |
बारामती शहरातील टी. सी. कॉलेज ते क्रिएटिव्ह अकॅडमी येथील रस्त्याचे डांबरीकरण होण्यासाठी श्री मंगलमूर्ती सेवा प्रतिष्ठान व स्थानिक नागरिक यांनी नगरपरिषद प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. त्याची दखल घेत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार गुरुवार, दि. १७ ऑगस्टपासून सदर रस्त्याचे डांबरीकरण सुरू करण्यात आले आहे.

यापूर्वी या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिकांना ये-जा करताना प्रचंड अडचण होत होती. त्याचप्रमाणे रस्त्यावर वाहने चालविणेसुद्धा कठीण झाले होते. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साठून अपघात होत होते. त्यामुळे या रस्त्याचे डांबरीकरण होणे गरजेचे होते. त्यामुळे स्थानिक नागरिक व श्री मंगलमूर्ती सेवा प्रतिष्ठानचे विकास देशपांडे, शिवाजी सावंत, मुकुंद तारू, अ‍ॅड. रमेश कोकरे, विकास फडतरे, बाळासाहेब खराडे, प्रा. राजेंद्र अटपळकर, आनंद कापडणीस, आदित्य भातलवंडे, सुधाकर गेजगे, स्वप्निल जिरंगे, अक्षय रणसिंग, सूरज तांबे, सौ. साधना सोपानराव पाचपुते व इतर स्थानिक नागरिकांनी रस्ता होण्यासाठी सातत्याने नगरपरिषद प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता.

त्यानुसार नगरपरिषद प्रशासनाने या रस्त्याचा विषय मार्गी लावल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.


Back to top button
Don`t copy text!