अखेर पुण्यात रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सचे जवान दाखल

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य पुणे दि.19 : पुण्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत या पार्श्‍वभूमीवर पुण्यात शीघ्र कृती दलाचे जवान पाचारण करण्यात आले आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात या जवानांनी रुटमार्च काढला होता.

पुणे पोलिसांसोबत हे शीघ्र कृती दलाचे जवानही शहरात महत्वाच्या ठिकाणी बंदोबस्ताचे काम पाहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. पुण्यात सोमवारी एकाच दिवशी कोरोनाचे 102 रुग्ण आढळले होते तर पिंपरी चिंचवडमध्ये 22 रुग्ण आढळले होते.

आत्तापर्यंत पुण्यात कोरोना बाधीतांची संख्या तीन हजारांच्या पुढे गेली असून पिंपरी चिंचवडमध्ये हि संख्या 226 एवढी आहे. अशी भयानक परिस्थिती असतानाही नागरिक मात्र शहरात बिनधास्त फिरतानाचे चित्र पहायला मिळत आहेत. या नागरिकांना चाप बसावा म्हणून यापुढे शीघ्र कृती दलाच्या जवानांची नजर अशा नागरिकांवर राहणार आहे. मुबई बरोबरच पुण्यात देखील कोरोना रुग्णाींच संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे प्रशासन चिंतेत आहे. अशा परिस्थितीत बेजबाबदार पणे फिरणार्‍या नागरिकांना प्रतिबंध घालण्यासाठी पोलिसांबरोबर आता रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सलाही अ‍ॅक्शन घ्यावी लागणार आहे.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!