
स्थैर्य, लोणंद, दि. 12 : लोणंद नगरपंचायतीचे नगराध्यक्ष सचिन शेळके यांच्यावर अविश्वास ठराव दाखल लोणंद मध्ये राजकीय भूकंप झाला असून17 पैकी 13 नगरसेवकांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे आज दुपारी 3 वाजून 15 मिनिटांनी सह्या चे पत्र देऊन अविश्वास ठराव दाखल केला नगराध्यक्ष इतर कोणत्याही नगरसेवकाला विश्वासात न घेता तसेच दरमहा जनरल बाॅडी मिटींग नियमीत बोलावली जात नसल्याने व नगरपंचायतीचे दैनंदिन कामकाज वेळच्या वेळी होत नाही तसेच नगराध्यक्ष मनमानी कारभार करत असल्याचा ठपका ठेवत राष्ट्रवादी चे पाच ,काँग्रेसचे सहा तर भाजपचे दोन अशा एकुण तेरा नगरसेवकांनी विद्यमान नगराध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव आज दुपारी सव्वातीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालय तेरा नगरसेवकांच्या सह्यांनिशी दाखल करण्यात आला आहे. यावेळी जननायक आमदार मकरंद आबा पाटील हे सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते.
या ठरावावर नगरसेवक हणमंत विनायकराव शेळके, विकास लुमा केदारी, श्रीमती शैलजा बाबासाहेब खरात, सौ. हेमलता रमेश कर्णवर, राजेंद्र सिताराम डोईफोडे, सौ. कृष्णाबाई भिकु रासकर,उपनगराध्यक्ष किरण पवार , सौ. स्वाती शरद भंडलकर, पुरूषोत्तम बाबुराव हिंगमिरे, लक्ष्मणराव सोपानराव शेळके, सौ. लिलाबाई विलास जाधव, योगेश उत्तमराव क्षीरसागर, सौ. दिपाली रविंद्र क्षीरसागर अशा तेरा नगरसेवकांनी आपल्या सह्यांचे पत्र जिल्हाधिकारी शेखरसिंह यांच्याकडे दिले आहे.