मुंबईतील साकीनाका परिसरात भीषण आग, परिसरात उंचच उंच धुराचे लोट


स्थैर्य,मुंबई, दि १४:  मुंबईच्या साकीनाका परिसरात भीषण आग  आगल्याची घटना घडली आहे. साकीनाका जंक्शन परिसरात असणाऱ्या नीलकंठ भवन याठिकाणी ही आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या चार गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम याठिकाणी सुरू आहे. दरम्यान या परिसरातील आगीचे व्हिडीओ समोर आले आहेत. त्यामध्ये धुराचे लोट आसमंतात जाताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर देखील स्थानिकांनी याठिकाणचे व्हिडीओ पोस्ट केले आहेत. अग्नीशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू आहेत.


Back to top button
Don`t copy text!