‘आय बी टी ‘ च्या वतीने उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार


दैनिक स्थैर्य । दि. ०३ एप्रिल २०२३ । बारामती । आय बी पी एस तर्फे 2022-23 मध्ये घेतलेल्या सरकारी बँक भरती परिक्षेमध्ये बारामती मधील आय बी टी बँकिंग क्लासेस चे सागर लोणकर व विशाल खरात ह्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले असून सागर लोणकर ह्याची सेंट्रल बँक ऑफ इंडिया च्या क्लार्क पदासाठी तर विशाल खरात ह्याची युनियन बँक ऑफ इंडियाच्या प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी निवड करण्यात आली आहे.

आय बी टी च्या संचालिका सारिका शहा यांनी या यशस्वी विद्यार्थ्यां चा सन्मान करून विद्यार्थ्यांनी अभ्यास व मार्गदर्शन च्या माध्यमातून मिळवलेले यश इतर विद्यार्थ्यांना प्रेरणादायी असल्याचे सांगितले. लौकिक शहा यांनी आभार व्यक्त केले.


Back to top button
Don`t copy text!