दैनिक स्थैर्य | दि. २१ ऑगस्ट २०२४ | फलटण |
जैन सोशल ग्रुपची १७ ऑगस्ट १९८० मध्ये मुंबई येथे स्थापना करण्यात आली. १७ ऑगस्ट रोजी ‘फेडरेशन डे’ साजरा करण्यात येतो. जैन सोशल ग्रुप, संगिनी फोरम, युवा फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने ‘फेडरेशन डे’ साजरा करण्यात आला.
यावेळी जैन सोशल ग्रुप इंटरनॅशनल फेडरेशनच्या ध्वजाचे सौ. सविता दोशी, सौ. अपर्णा जैन, श्री. तेजस शहा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी फलटण तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष श्री. मंगेश दोशी, जैन सोशल ग्रुपचे उपाध्यक्ष श्री. श्रीपाल जैन, सचिव श्री. प्रीतम शहा, खजिनदार श्री. समीर शहा, माजी अध्यक्ष श्री. राजेंद्र कोठारी, श्री. सचिन शहा, श्री. डॉ सूर्यकांत दोशी, संगिनी फोरम संस्थापक अध्यक्षा सौ. स्मिता शहा, संचालक डॉ. श्री. मिलिंद दोशी, श्री. प्रीतम गांधी, श्री. राजेश शहा, श्री.तुषार शहा उपस्थित होते.
याप्रसंगी जैन सोशल ग्रुप फलटण, संगिनी फोरम, युवा फोरम संचालकांनी झेंड्याला मानवंदना दिली. झेंडावंदन झाल्यानंतर सर्व मान्यवरांकरिता अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते, हा कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला.
फेडरेशन सप्ताहानिमित्त जैन सोशल ग्रुपकडून ओमकार वृद्धाश्रमातील वृद्धांना ब्लँकेट व साड्यांचे वाटप करण्यात आले.
फेडरेशन डे निमित्त डॉ. मिलिंद दोशी यांच्या अश्विनी क्लिनिकमध्ये मोफत ई. सी. जी. कॅम्प घेण्यात आला. एकूण २० ई.सी.जी. यावेळी काढण्यात आले. ईसीजी काढण्याकरिता डॉ. सिद्धांत दोशी, डॉ. सौ. समया दोशी यांचे योगदान लाभले.