पतीच्या त्रासाला कंटाळून महिला डॉक्टरची विषारी इजेंक्शन घेऊन आत्महत्या

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य,पुणे,दि २ : दारू पिऊन शिवीगाळ करीत चारित्र्यावर संशय घेण्याच्या पतीच्या त्रासाला कंटाळून नैराश्यात असलेल्या एका डॉक्टर महिलेने इंजेक्शनचा डोस घेऊन राहत्या घरी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वारजे माळवाडी परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी पतीवर वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मनिषा रमेश कदम (वय.45,रा.वारजे माळवाडी, मुळ मेढा) असे आत्महत्या केलेल्या डॉक्टर महिलेचे नाव आहे. रमेश नारायण कदम (रा.वेन्ना चौक,ता. मेढा,जि.सातारा) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी डॉक्टर महिलेची आई मालन अलसे (वय.66, वारजे माळवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.

ठाकरे सरकार वाड्या-वस्त्यांची जातीवाचक नावे बदलणार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत मनिषा आणि त्यांचे पती दोघेही व्यवसायाने डॉक्टर आहेत. पतीचे सातारा जिल्ह्यातील मेढ्यात हॉस्पिटल आहे. 2006 मध्ये मनिषाचा विवाह झाला. रमेश नेहमी दारुच्या नशेत तिला मारहाण आणि चारित्र्याच्या संशयावरुन शिवीगाळ करीत होता. त्यातूनच अनेकदा उपाशी ठेवले जात होते. त्याने मनिषाला माहेरी सोडल्यावर पुन्हा नांदण्यास नेले नाही.

मागील काही महिन्यापासून त्या माहेरी आपल्या आई-वडिलांकडे वास्तव्यास होत्या. काही दिवसांपासून त्या पालिकेच्या रुग्णालयात काम पाहत होत्या. कोविडच्या काळात देखील एकाच दिवशी दहा महिलांची प्रसुती करण्याचे काम केल्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले होते.त्यांच्या सासरच्या मंडळीसोबत सामोपचारासाठी एक बैठक देखील झाली होती. त्यावेळी पतीने त्यांना सासरी नेण्यास नकार दिला होता. त्यांची मोठी मुलगी पतीकडे वास्तव्यास होती तर लहान त्यांच्यासोबत होती. त्यांना मुलीली भेटता येत नव्हते. त्यामुळे मागील काही दिवसापासून त्या नैराश्यात होत्या. त्यातून सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून त्यांनी इंजेक्शनचा डोस घेत आत्महत्या केली. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक एस.एस कथले करत आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!