स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘भय’ इथले संपत नाही….

Team Sthairya by Team Sthairya
December 28, 2020
in अग्रलेख, लेख, विशेष लेख, संपादकीय
देशात लस वितरणासाठी द्विस्तरीय वाहतूक व्यवस्था
ADVERTISEMENT


मार्च 2020 मध्ये आलेला ‘कोरोना’ डिसेंबर महिना संपत आला तरी अजूनही जगात फैलावतच आहे. चिनमधून आलेला हा भयानक विषाणू सर्वत्र मोठ्या वेगाने फैलावला. यामुळे संपूर्ण भारताचे सन 2020 मधील एप्रिल, मे, जून हे तीन महिने लॉकडॉऊनमध्ये गेले. जुलैपासून लॉकडाऊन हळूहळू अनलॉक होऊ लागले. आत्ता गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून कोरोनावरील लस दृष्टीक्षेपात आली. कोरोना विषाणूची तीव्रताही काही प्रमाणात कमी होऊ लागली. आता जानेवारीत लस मिळणार आणि हळूहळू देश कोरोनामुक्त होणार असे मनोमन सर्वांनाच वाटू लागले होते. मात्र अशातच गेल्या काही दिवसांपासून दक्षिण अफ्रिका आणि ब्रिटनचा नवीन कोरोना संपूर्ण जगाची पुन्हा एकदा डोकेदुखी बनू पाहत आहे. सन 2020 हे वर्ष कोरोनाची लढण्यात गेले. नवीन 2021 वर्ष अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपले आहे. नूतन वर्ष कोरोनामुक्त असेल असे जरा कुठे वाटत असताना आता कोरोनाच्या या नव्या प्रकाराने ‘भय इथले संपत नाही….’ अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

ब्रिटनमध्ये करोनाचा अतिशय झपाट्याने पसरणारा करोनाचा नवीन प्रकार आढळून आला. कोरोनाविरुद्ध लसीकरण मोहिम सुरु करुन कोरोनावर मात करण्याच्या उद्देशाने वाटचाल करणारा ब्रिटन अचानक नवीन रुपात आलेल्या कोरोनामुळे पुन्हा एकदा बॅकफुटवर गेला आहे. हा नवीन कोरोना फार वेगाने संक्रमीत होत असल्याचे निरीक्षण नोंदवले गेल्याने अनेक भागात बंधने वाढवण्यात येत असल्याचे वृत्त विविध माध्यमांमधून दिले जात आहे. शिवाय भरीस भर म्हणून अशाच प्रकारे नवीन व्हायरस दक्षिण आफ्रिकेतही वेगाने पसरत आहे. कदाचित यामुळेच ब्रिटनला करोनाच्या दुसर्या मोठ्या लाटेचा सामना करावा लागतोय, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. नवीन करोना व्हायरस पूर्वीच्या व्हायरसपेक्षा 70 टक्के अधिक वेगाने पसरतो, असं बोललं जातंय. गेल्या काही आठवड्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेत जाऊन आलेल्या प्रवाशांच्या संपर्कात आलेल्यांमध्ये हा नवीन प्रकारचा करोना व्हायरस समोर आला आहे.

थोडक्यात काय तर कोरोनाची दाहकता कमी होत आहे असे वाटताना पुन्हा एकदा नव्या स्वरुपात कोरोना आपले हात पाय फैलावेल का काय? अशी भिती जगातील सर्वच देशांना वाटणे स्वाभाविक आहे. कारण न भूतो न भविष्यती अशी विदारक परिस्थिती सर्वांनीच गेल्या काही दिवसांमध्ये अनुभवली आहे. आणि आता पुन्हा त्याच परिस्थितीला सामोरे जाण्याची मानसिकता आता ना प्रशासनाची आहे ना सर्वसामान्यांची आहे. मात्र ‘सिर सलामत तो पगडी पचास’ या उक्तीप्रमाणे जर कोरोनाने जीवघेणे स्वरुप पुन्हा एकदा विस्तारले तर नाईलाजास्तव लॉकडाऊनच्या स्थितीत सर्वांना पुन्हा जावे लागेल.

राज्याचा विचार केला तर अजूनही कोरोना रुग्णांच्या व मृत्यूच्या संख्येत महाराष्ट्र आघाडीवर आहे. शिवाय कोरोना बरा झाल्यानंतरही बर्‍याच जणांना त्रास होवून परिणामी प्राणही गमवावे लागत आहेत. यावरुन आपली वैद्यकीय यंत्रणा कोरोनाबाबतीत अजूनही 100% सक्षम नाहीत हे सिद्ध होते. त्यातच जर कोरोनाची नवीन लाट राज्यात उसळली तर काय होईल? याचा विचार करुन नागरिकांनी स्वत:हून कडक बंधने पाळणे गरजेचे आहे. एकीकडे शासनाने खबरदारीचा उपाय म्हणून महानगरपालिका क्षेत्रात नाईट कर्फ्यु सुरु केला आहे. गेल्या काही दिवसात ब्रिटनहून आलेल्या नागरिकांची शोधाशोध सुरु झाली आहे आणि दुसरीकडे या परिस्थितीत सुट्टीचा आनंद घ्यायला व नववर्षाचे स्वागत करायला महानगरातले अनेक महाभाग वेगवेगळ्या पर्यटनस्थळांवर मोठ्या गर्दीने जमले आहेत. खरं तर लसीकरण मोहिम सुरु होऊन तिचा परिणाम दिसून येईपर्यंत लोकांनी सबुरीने, फिकीरीने आणि जबाबदारीने वागणे गरजेचे आहे.

दैनिक स्थैर्यच्या अधिकृत WhatsApp ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.

रोहित वाकडे, संपादक साप्ताहिक लोकजागर, फलटण.


दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ADVERTISEMENT
Previous Post

अनिल अंबानींना मोठा झटका, आरकॉमची ३ बँक खाती ‘फ्रॉड!

Next Post

शिरवळच्या चौकातून दुचाकी चोरणारा गजाआड

Next Post
शिरवळच्या चौकातून दुचाकी चोरणारा गजाआड

शिरवळच्या चौकातून दुचाकी चोरणारा गजाआड

ताज्या बातम्या

“…तर सोलापूर, सांगली आमच्याकडे घेऊ”; कर्नाटकच्या गृहमंत्र्यांची महाराष्ट्राला पोकळ धमकी

“…तर सोलापूर, सांगली आमच्याकडे घेऊ”; कर्नाटकच्या गृहमंत्र्यांची महाराष्ट्राला पोकळ धमकी

January 19, 2021
ग्रामपंचायत निवडणूक: राम शिंदेंचा पराभव केल्यानंतर रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया ; म्हणाले…

ग्रामपंचायत निवडणूक: राम शिंदेंचा पराभव केल्यानंतर रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया ; म्हणाले…

January 19, 2021
आधुनिकीकरणाकडे वाटचाल करताना मातृभूमी, मातृभाषा,सदाचार आणि संस्कृतीला विसरु नका – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

आधुनिकीकरणाकडे वाटचाल करताना मातृभूमी, मातृभाषा,सदाचार आणि संस्कृतीला विसरु नका – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

January 19, 2021
रस्ता सुरक्षा लोकअभियान बनायला हवे  जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे प्रतिपादन: अभियानाचे उद्घाटन

रस्ता सुरक्षा लोकअभियान बनायला हवे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे प्रतिपादन: अभियानाचे उद्घाटन

January 19, 2021
जिल्ह्यातील 75 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित

43 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित 1 बाधिताचा मृत्यु

January 19, 2021
इंग्लँड सीरीजसाठी भारतीय संघाची घोषणा

इंग्लँड सीरीजसाठी भारतीय संघाची घोषणा

January 19, 2021
गगन भरारी! जागतिक विक्रमासाठी साताऱ्यातील पाच बाल वैज्ञानिकांची निवड

गगन भरारी! जागतिक विक्रमासाठी साताऱ्यातील पाच बाल वैज्ञानिकांची निवड

January 19, 2021
किल्ले सज्जनगड परिसरात मद्यपींचा धिंगाणा; राजरोस पार्ट्यांचे नियोजन

किल्ले सज्जनगड परिसरात मद्यपींचा धिंगाणा; राजरोस पार्ट्यांचे नियोजन

January 19, 2021
त्रिशंकू भागातील समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य देऊ  आ. शिवेंद्रसिंहराजे;

त्रिशंकू भागातील समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य देऊ आ. शिवेंद्रसिंहराजे;

January 19, 2021
मुंबईतील ७८% भाडेकरूंचे २०२१ मध्ये स्वतःचे घर खरेदी करण्याचे स्वप्न: नोब्रोकर

मुंबईतील ७८% भाडेकरूंचे २०२१ मध्ये स्वतःचे घर खरेदी करण्याचे स्वप्न: नोब्रोकर

January 19, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.