एफसी मद्रासने विश्वस्तरीय रेसिडेन्शियल फुटबॉल अकॅडेमी सुरु केली

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. २७ मार्च २०२३ । मुंबई । ‘आयुष्यभरासाठी चॅम्पियन्स’ घडवण्याच्या उद्देशाने चालवली जात असलेली, नव्या युगातील फूटबॉल अकॅडेमी एफसी मद्रासने आज चेन्नईच्या जवळ महाबलीपूरम मध्ये एक विश्वस्तरीय फुटबॉल अकॅडेमी सुरु केली आहे. नवीन ‘होम ऑफ एफसी मद्रास’ एआयएफएफ (ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन) आणि एएफसी (एशियन फुटबॉल कॉन्फेडरेशन) यांनी तयार केलेल्या फिफा स्टँडर्ड्सनुसार तयार करण्यात आले आहे. २३ एकरांवर पसरलेल्या या एकात्मिक कॅम्पसमध्ये आधुनिक फ्लडलिट फुटबॉल पिचेस आहेत, यामध्ये पूर्व आशियातील पहले हायब्रीड पिच, फंक्शनल स्ट्रेन्थ अँड कंडिशनिंग सेंटर, मेडिकल व रिकव्हरी सुविधा, आंतरराष्ट्रीय दर्जाचे इनडोर फुटसल पिच, सहा लेनचा स्विमिंग पूल, आधुनिक किचन, डायनिंग सुविधा, निवासी होस्टेल आणि एनआयओएस अभ्यासक्रम असलेले ऑप्शनल लर्निंग सेंटर यांचा समावेश आहे.

कौशल्य विकासाची दीर्घकालीन वचनबद्धता या अकॅडेमीने स्वीकारली आहे. फुटबॉलच्या जागतिक दर्जाच्या पायाभूत सोयीसुविधा आणि फुटबॉल, शिक्षण व जीवनावश्यक कौशल्ये यांचा समावेश असलेली कार्यप्रणाली यांचा अनोखा मिलाप उपलब्ध करवून देणे हे या अकॅडेमीचे उद्दिष्ट आहे. याठिकाणी निवासी सुविधेमध्ये १३० खेळाडू राहू शकतात, त्यांच्या प्रशिक्षण व शिक्षणाची व्यवस्था याठिकाणी होऊ शकते.

एफसी मद्रासचे संस्थापक श्री गिरीश मातृभूतम् यांनी सांगितले, “पुढचा मेसी मद्रासमधून शोधायचा हे आमचे स्वप्न आहे. आपल्या देशातील युवकांमध्ये अद्भुत क्रीडा प्रतिभा आहेत, यशस्वी होण्याच्या सर्व क्षमता त्यांच्यामध्ये आहेत. त्यांना स्वतःच्या वास्तविक क्षमता अनलॉक करता याव्यात यासाठी पायाभूत सुविधा, वातावरण आणि संधी मिळणे आवश्यक आहे. आज सरकार व खाजगी कंपन्या खेळ व खेळांसाठी आवश्यक पायाभूत सोयीसुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर रस घेत आहेत ही बाब अतिशय उत्साहवर्धक आहे. मी असे मानतो की, नवे एफसी मद्रास कॅम्पस इतर नेते व व्यवसायांना अशा प्रकारच्या अकॅडेमी बनवण्यासाठी प्रेरणा देईल कारण आपल्या भविष्याला चॅम्पियन्सची गरज आहे.”

एफसी मद्रासमध्ये स्पोर्ट्स आणि गव्हर्नन्सचे डायरेक्टर श्री धनंजय सीकेएम (उर्फ डीजे) यांनी सांगितले, “एफसी मद्रास ही भारतातील पहिली स्मार्ट फुटबॉल अकॅडेमी असेल जिथे आपल्या खेळाडूंसाठी जागतिक दर्जाच्या फुटबॉल अकॅडेमी प्रथा आणि क्रीडा तंत्रज्ञानामध्ये डेटा अनॅलिटीक्स, व्हिडिओ ऍनालिसिस, स्पोर्ट्स सायन्स यासारखी तांत्रिक प्रगती आणि स्पोर्ट्स न्यूट्रिशनवर आधारित जास्तीत जास्त चांगली कामगिरी यांचा मिलाप घडवून आणला जाईल.”

एफसी मद्रासने कुशल युवा फुटबॉल खेळाडूंसाठी एक शिष्यवृत्ती कार्यक्रम सुरु केला आहे. अतिशय काटेकोर राष्ट्रव्यापी स्काऊटिंग प्रोग्राममार्फत त्यांची निवड केली जाते. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करून देशाचा मान वाढवतील असे खेळाडू जिथे निर्माण केले जातील असे एक सर्वोत्तम फिनिशिंग स्कूल फुटबॉलसाठी तयार करावे हा या अकॅडेमीचा उद्देश आहे.


Back to top button
Don`t copy text!