दैनिक स्थैर्य | दि. २९ जानेवारी २०२४ | फलटण |
फलटण तालुक्यातील करंजखोप येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न व फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषीदूतांनी कृषी जागरूकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत गावातील शेतकर्यांना गादीवाफा तयार करण्याचे प्रात्यक्षिक सादर केले.
कृषीदूतांनी गादीवाफा कसा तयार करावा व गादीवाफ्याचे महत्त्व शेतकर्यांना सांगितले. गादीवाफ्यावर घेतलेल्या बियांची उगवणक्षमता चांगली राहते, तसेच तणनियंत्रणदेखील चांगल्या प्रकारे करता येते. गादीवाफा हा भाजीपालायुक्त पिकांसाठी जसे की टोमॅटो, वांगी, मिरची इत्यादींसाठी उपयुक्त आहे.
कृषी महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण सर व श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर सर, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलीमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील लाळगे व प्रा. नितिषा पंडित व संजय अडत सर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीदूत दुधाळ सौरभ, बेलदार शुभम, लोखंडे सुप्रीत, मिंड शिवरूप, ढोबळे सुमित, दोडमिसे शुभम यांनी हे प्रात्यक्षिक करून दाखविले.