
दैनिक स्थैर्य । 2 जुलै 2025 । सातारा । शेतकर्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून, आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन बांनी केले.
सेंद्रीय शेती, फुले, फळे व दुग्धक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या जिल्ह्यातील 19 शेतकरी कन्यांना जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे पुरस्कारांचे वितरण कृषी दिनी, मंगळवारी जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, जिल्हा कृषी अधीक्षक भाग्यश्री फरांदे, कृषी विकास सातारा पुरस्कारविजेत्या शेतकर्यांसमवेत बाशनी नागराजन, विश्वास सिद, गजानन ननावरे, डॉ. विनोद पवार, अजय शेंडे, अधिकारी गजानन ननावरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार, आत्माचे अजय शेंडे उपस्थित होते.
नागराजन म्हणाल्या, प्रत्येक कुटुंबातील एकाने शेतीचे शिक्षण घेऊन, आधुनिक पद्धतीने शेती करावी. फलोत्पादन, दुग्धोत्पादनासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. समूह शेतीला प्राधान्य देणे, उत्पादित मालाला बाजारपेट मिळण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत. फलटणमधील धुमाळवाडीने फळांचे गाव, म्हणून ओळख निर्माण केली आहे. त्याप्रमाणे शेतकर्यांनी आपापल्या गावांची वेगळी ओळख निर्माण करावी. विश्वास सिद म्हणाले, शेती क्षेत्रातील बदलांचे अनुकरण केल्यास शेतकर्यांची आर्थिक उन्नती होईल. युवकांनी आपल्या शिक्षणाचा रोतीमध्ये उपयोग करावा पुरस्कारविजेत्या शेतकन्यांमध्ये महिलांचाही समावेश आहे. ही बाब प्रेरणादायी अशी आहे.
भाग्यश्री फरांदे म्हणाल्या, कृषी विभाग शेतकर्यांसाठी कष्ट घेत आहे. मात्र, 50 टक्क्यांपेक्षा जास्त शेतकरी फार्मर आयडी काढत नाहीत, ही शोकांतिका आहे. गजानन ननावरे यांनी प्रास्ताविक केले. अंकुश सोनावले यांनी सूत्रसंचालन केले. बाळासाहेब केटे यांनी आभार मानले.
या शेतकर्यांचा झाला पुरस्काराने सन्मान
डॉ. के. के. बसू सेंद्रीय शेती पुरस्कार प्रदीप शेलार (प्रथम, रा. कोयनानगर, ता. पाटण), सुरेश बोराटे (द्वितीय, रा. बिदाल, ता. माण), अमोल भोसले (तृतीय, रा. एकसळ, वा. कोरेगाव), अशोक जाधव (रा. चिंचनेर निंब, ता. सातारा), संदीप चन्हाण (रा. असवली, ता. खंडाळा, दोन्ही उत्तेजनार्थ), यशवंतराव चव्हाण फलोत्पादन पुरस्कार बबन मुळीक (प्रथम, रा. सासकल, ता. फलटण), महेंद्र घुमाळ (द्वितीय, रा. धुमाळवाडी, ता. फलटण), उत्तम गाडे (रा. आसनगाव, ता. कोरेगाव) व बाळकृष्ण बंडगर (रा. होलेवाडी, ता. कोरेगाव, विभागून तृतीय), शंकर जाधव (उत्तेजनार्थ, रा. भाटमाळी, ता. मातारा), यशवंतराव चव्हाण फुलोत्पादन पुरस्कार सचिन शेलार (प्रथम, रा. म्हसवे, ता. सातारा), अजित पाटील (द्वितीय, रा. मांडवे, ता. खटाव), संजय पवार (तृतीय, रा. वडोली निळेश्वर, ता. कराड), यशवंतराव चव्हाण दुग्धोत्पादन पुरस्कार शिवम वाधव (रा. पुसेगाव, ता. खटाव) व दीपाली भागवत (रा. कण्हेरी, ता. खंडाळा, विभागून प्रथम), स्वाती पवार (रा. मुंजवडी, ता. फलटण) व मनीषा पवार (रा. राजाळे, ता. फलटण, विभागून द्वितीय), मानसी कणसे (रा. शेणोली, ता. कराड) व गणपत सपकाळ (रा. चोराबे, ता. जावळी, विभागून तृतीय). प्रथम पुरस्कार 25 हजार रुपये, द्वितीय पुरस्कार 15 हजार रुपये, तृतीय 10 हजार रुपये, प्रमाणपत्रे, सन्मानचिन्हे, शाली देऊन शेतकर्यांचा सपानीक सत्कार करण्यात आला.