दैनिक स्थैर्य । दि. ०४ डिसेंबर २०२२ । सातारा । विठ्ठलवाडी येथील सर्व शेतकरी बांधवांसाठी टाटा समूहाच्या धान्या सिड्स कंपनीने मका वाण ८७९ व बाजरी वाण ७३९ या दोन्ही वाणांच्या बद्दल सखोल मार्गदर्शन कंपनीचे महाराष्ट्र प्रमुख श्री.माणिक देशमुख साहेब यांनी यावेळी केले कंपनीचा नवीन वाण ८७९ याचे २० गुंठे क्षेत्रातील उत्पादन शेतकरी बांधवांसमोर दाखवून वाणांच्या बद्दल सखोल मार्गदर्शन केले.त्याच बरोबर बाजरी हे पिक मुख्यतः आपण भाकरी खाण्यासाठी वापरत असतो त्यामुळे कंपनीने त्यांच्या ७३९ वाणांच्या भाकरी चवीसाठी ठेवले होते धान्या सिड्स कंपनीचा हा वाण शेतकरी बांधवांसाठी उपयुक्त आहे आणि सगळीकडे उत्पान्नाची जादु दाखवणारा आहे हे शेतकरी बांधवांसमोर दाखवून दिले याच कार्यक्रमात ८७९ या मका वाणांचे २० गुंठे क्षेत्रावर १९.क्विंटल उत्पादन काढल्यामुळे श्री.सोमनाथ बोडके यांचा कंपनीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच इतर शेतकरी बांधवांचा ही सत्कार करण्यात आला कार्यक्रमासाठी तरडगाव काळज सुरवडी चव्हाणवाडी इतर पंचक्रोशीतील सर्व शेतकरी बांधव व कृषी सेवा केंद्राचे मालक उपस्थित होते.