
दैनिक स्थैर्य । 14 जुलै 2025 । फलटण । जिंती येथे फलटण एज्युकेशन सोसायटी संचालित कृषी महाविद्यालय फलटण येथील कृषिकन्यांनी ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प 2025-26 अतंर्गत बीजातून आंब्याचे कलम करण्याचे प्रशिक्षण गावातील शेतकर्यांना दिले.
कृषीकन्यांनी शेतकर्यांना पटवून दिले. कलमाचे महत्त्व कलमापासून फळांच्या विविध नवीन जाती ही तयार करता येतात. वैशिष्ट्यपूर्ण झाड कलमापासून तयार होते. बीज कलम प्रक्रिया योग्य पद्धतीने केली तर उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते. कृषी कन्या वैष्णवी पुणेकर, वैष्णवी देवकर, वैष्णवी कारखेले, प्रीती मांजरे, मुस्कान शेख, निकम श्वेता, कुटे कल्याणी यांनी हा कार्यक्रम राबविला.
या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. यू.डी. चव्हाण , कार्यक्रम अधिकारी प्रा. सुरेश साळुंखे, प्रा.नितीशा पंडित, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलिमा धालपे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.