दैनिक स्थैर्य | दि. १७ सप्टेंबर २०२३ | फलटण |
कृषी महाविद्यालय, फलटण येथील अंतिम वर्षातील विद्यार्थिनींनी पिंपरद येथील शेतकर्यांना व्यावसायिकद़ृष्ट्या गादीवाफा तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. यावेळी दहा शेतकरी उपस्थित होते.
व्यावसायिक दृष्टिकोनातून रोपे तयार करणे, ही पद्धत शेतकर्यांसाठी कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवून देणारी आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकर्यांनी या पद्धतीचा अवलंब करावा. हे महत्त्व कृषीकन्यांनी शेतकर्यांना पटवून दिले. हा वाफा तयार करण्यासाठी ३ मीटर लांबी, १.२ मीटर रुंदी आणि १५ ते ३० सेमी. उंची ही मापे घेऊन वाफा तयार करण्यात आला. जमिनीतील पाण्याची धारण क्षमता वाढवण्यासाठी व रोपांना पोषक तत्वे मिळण्यासाठी शेणखताचा वापर केला गेला. कृषीकन्यांनी शेतकर्यांना या गादीवाफ्यावर कोणकोणती रोपे तयार करावी, हे सांगितले. त्यामध्ये मिरची, टोमॅटो, कांदा, वांगी रोपे तयार केली जातात, हे शेतकर्यांना समजले.
कृषी महाविद्यालय फलटणचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण सर, कार्यक्रम समन्वयक नीलिमा धालपे मॅडम, तसेच कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे सर, नीतिशा पंडित मॅडम आणि प्रा. संजय अडत सर यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली कृषीकन्या प्रतीक्षा जगताप, अक्षदा जाधव, प्रणिता गोडसे, निशिगंधा खेडे, आरती जाधव, आर्या जाधव, समृद्धी जगताप यांनी हे प्रात्यक्षिक करून दाखवले.