दैनिक स्थैर्य | दि. ३१ ऑगस्ट २०२३ | फलटण |
फलटण एजुकेशन सोसायटीचे, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त कृषी महाविद्यालय फलटण येथील अंतिम वर्षातील कृषिकन्यांमार्फत ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत पिंपरद येथे ‘शेतकरी दिन’निमित्त शाश्वत ऊस शेती मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी पिंपरद गावच्या सरपंच स्वाती भगत, उपसरपंच सागर बोराटे आणि गावातील ऊस बागायतदार भूषण शिंदे, प्रताप शिंदे व गावातील शेतकरी कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक प्रा. डॉ. वैभव गायकवाड सर यांनी शेतकरी दिनानिमित्त ‘शाश्वत ऊस शेती’ याविषयी शेतकर्यांना मार्गदर्शन केले. तसेच उत्तम पद्धतीने उसाची शेती कशी करावी, याबद्दल माहिती दिली.
पिंपरद गावात उसाला हुमनीचा प्रादुर्भाव जास्त असल्याने त्यावर शैलेश फडतरे सर (गोविंद फाउंडेशन फिल्ड मॅनेजर) यांनी कोणत्या उपाययोजना कराव्यात, याबद्दल माहिती सांगितली व शेतकर्यांच्या शंकेचे निरसन केले. या कार्यक्रमांतर्गत पिंपरद गावच्या ऊस बागायतदारांना उसाची शेती उत्तम पद्धतीने कशी करावी, यावर अत्यंत चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन भेटले.
कृषी महाविद्यालय फलटणचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण सर व कार्यक्रम समन्वयक प्रा. निलिमा धालपे मॅडम तसेच कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे सर, प्रा. नितिशा पंडित मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत कृषीकन्या कु. प्रतिक्षा जगताप, अक्षदा जाधव, प्रणिता गोडसे, आरती जाधव, आर्या जाधव, समृद्धी जगताप, निशिगंधा खुडे यांनी शेतकरी दिन कार्यक्रम राबविला.